गणपती आरती !!!
पशुशिरीं सोंड पोर मानवाचें ॥ सोंग गणोबाचें ॥ नोंद ग्रंथी ॥ धृ.॥ बैसे उंदरावरी ठेवूनियां बूड ॥ फुकितो शेंबूड ॥ सोंडेंतून ॥१॥ अंत्यजासी दूर, भटा लाडू देतो ॥ नाकानें सोलीतो ॥ कांदे गणू ॥२॥ चिखला तुडवूनी बनविला मो-या ॥ केला ढंबुढे-या ॥ भाद्रपदीं ॥३॥ ******** वांचून ॥ करवी भ्रमण ॥ सर्व लोकीं ॥४॥ ***** चंद्र हांसला म्हणून ॥ श्रापवरदान ॥ पाहील्यास ॥५॥ ***** चंद्रास पाहीलें ॥ अस्वली वरीलें ॥ कृष्णदेवें ॥६॥ **** वस्त्र गणुजी दोंदीला ॥ नोवरा मिळाला ॥ देवबाप्पा ॥७॥ गणोबाची पूजा भावीका दाविती ॥ हरामाच्या खाती ॥ तूपपोळया ॥८॥ जे मंगलमूर्ती जै मंगलमूर्ती ॥ गाती नित्य कीर्ती ॥ टाळ्यांसह ॥९॥ उत्सवाच्या नांवें द्रव्य भोंदाडीती ॥ वाटी खिरापती ॥ धूर्त भट ॥१०॥ जातिमारवाडी गरीबा नाडिती ॥ देऊळें बांधीती ॥ कीर्तीसाठीं ॥११॥ देवाजीच्या नांवें जगाला पीडीती ॥ अधोगती जाती ॥ निश्चयानें ॥१२॥ खरे देवभक्त देह कष्टविती ॥ पोषण करीती ॥ घरच्यांचें ॥१३॥ अजाणाशी ज्ञान पांगळया अन्नदान ॥ हेंच बा स्मरण ॥ निर्मीकाचें ॥१४॥ भोळा वारकरी त्यास दिली हूल ॥ स्मरर्णाते फल ॥ आहे म्हणे ॥१५॥ क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास ॥ गांठी शिव...